Cine Quiz Contest Answers

Cine Quiz Contest

1st Winner Name - Eknath Gopal

तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता? तो का आवडला वर्णन करा.

मला आवडलेला सिनेमा Django - The Unchained. Django सिनेमा वर्णवादावर आधारित आहे. काळ्या गुलामांची विक्री, काळ्या स्त्रियांना बागेमध्ये काम लावून त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण या सिनेमामध्ये दाखवलं आहे. गोऱ्या लोकांसोबत राहून त्यांचे निजी काळे सहकारी काळे असले तरी अधिकार आल्यावर गोऱ्यांची भाषा बोलू लागतात. Django या नायकाला स्वतः सोबत त्याची बायको आणि इतर गुलामांची मुक्ती करण्याचा आणि शोषण थांबवण्याचा हा प्रवास आहे. अन्यायाच्या बेड्या आणि गुलामीच्या बेड्या तोडणारा हा सिनेमा आहे. यामध्ये वापरलेलं music आणि काळानुसार बदलणाऱ्या व्यक्तिरेखांसाठी प्रकाश योजना चित्रपट कोणत्याही भाषेत असला तरी आपला करून जातो.

तुमचा आवडता सिने-दिग्दर्शक कोणता? का आवडतो थोडक्यात वर्णन करा.

माझे आवडता दिग्दर्शक - सत्यजित रे त्यांच्या सिनेमांची आणि लघुपटांची मांडणी मला भावते. Two या लघुपटामध्ये दोन मुलांच्या आर्थिक, राजकीय,मानसिक आणि सामाजिक भूमिकेवर एकाच वेळी प्रकाश टाकला आहे. एकही संवाद नसलेली ही शॉर्ट फिल्म भावते ती त्याच्या music ने. छोट्या छोट्या दृश्यांतून मोठे मोठे अर्थ सत्यजित रे देतात. 'चारू' या सिनेमाच्या नायिकेसाठी बनवलेली थीम तिचं एकटेपण असल्याची भावना स्पष्ट करते. Music, पात्रांमधील वास्तवता, Poster disign, आणि समोर बसलेल्या प्रेक्षकाला पात्र आपणच आहोत ही भावना उमटवण्याच्या कलेमुळे सत्यजित रे मला आवडतात.

कुठे सिनेमा बघणे आवडते? ओटीटी प्लाटफॉर्म की सिनेमा थिएटर. का?

सिनेमा थिएटरमध्येच पहायला आवडतो.
1) स्क्रीन मोठी असते.
2) सिनेमा पहायला गेलोय म्हणून सिनेमाच पाहतो आपण. OTT वर पाहताना काहीही काम आलं तर सिनेमा मध्येच थांबतो. पुन्हा पाहताना त्या भावना जुळून येत नाहीत.
3) OTT वर छोटी स्क्रीन असल्याने डोळ्यांना त्रास होतो.

ओटीटी प्लाटफॉर्मवर तुम्ही फिल्म सलग बघता की तुकड्या-तुकड्यात बघता? कारण स्पष्ट करा.

OTT वर सिनेमा सलगच पाहतो. तुकड्या तुकड्यात पाहण्याची मजा नाही. सिनेमा पाहताना आपल्या भावना त्याच्या सोबत जोडलेल्या असतात.पुन्हा सिनेमा तिथून पाहताना भावना त्याच राहत नाहीत.

फिल्म बघताना नावडता भाग गाळून फिल्म बघता का? कोणता भाग नावडता असतो? का?

फिल्म पाहताना कोणताही भाग गाळत नाही. नावडता भाग असा कोणता नाही माझा. एक सिनेमा बनवण्यासाठी बरेच हात पाठी असतात त्या सिनेमाच्या तर कोणत्याही सिनेमातून घेण्यासारखं बरच असतं माझ्यासाठी म्हणून कोणताच भाग पळवत नाही.

कोणत्या शैलीतील चित्रपट तुम्हाला आवडतात? फैमली ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, रोमांस, हॉरर, हिस्ट्री और बायोग्राफी बेस्ड, सत्य घटनेवर आधारित. का ते वर्णन करा?

मला सत्य घटनेवर आधारित सिनेमा पाहायला आवडतो. मी प्रत्येक सिनेमामध्ये मी पाहिलेले आणि अनुभवलेली गोष्ट शोधत असतो. सत्य घटनेवर आधारित सिनेमामुळे इतिहास समजतो, घटना समजतात, एक काळ उभा राहतो डोळ्यासमोर. ड्रामा, कॉमेडी, रोमान्स,हॉरर, हिस्ट्री आणि बायोग्राफीचे विषय या ना त्या मार्गाने सत्य घटनेवर आधारित सिनेमामध्ये येतच असतात. म्हणून ते जॉनर विशेष वेगळे पाहण्याची गरज मला वाटत नाही.

कोणत्या सिनेमाचा क्लायमॅक्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला? का ते वर्णन करा.

सैराट या सिनेमाचा क्लायमॅक्स मला आवडला. पहिल्या भागापर्यंत सिनेमा प्रेमात असतानाची रुपेरी दुनिया दाखवतो. परंतु दुसऱ्या भागामध्ये आर्ची(नायिका) नाक दाबून संडासचा डबा घेऊन सार्वजनिक शौचालयामध्ये जाताना दाखवतात. परंतु इंटरवलपूर्वी स्वतंत्र असणाऱ्या तिच्या गोष्टी कुचंबण्याच्या रुपात दिसतात. प्रेमानंतरच भीषण सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिला सामोरं जाणारं जोडपं मला दिसतं. प्रेम म्हणजे व्यक्त होणाऱ्या भावना नंतर एकमेकांच्या सुख दुःखात भाग घ्यायला लावतात. फुलपाखरांच्या अंगावर असणारे रंग जसे प्रेमात असतात तसे क्लायमॅक्स नंतर उडतात. म्हणून या सिनेमाचा क्लायमॅक्स मला भावतो.

बघण्यासाठी फिल्मची निवड तुम्ही कशाच्या आधारावर करता? कथा, अभिनेता/अभिनेत्री, दिग्दर्शक, गीत-संगीत, ट्रेलर, पटकथा लेखक, छायाचित्रकार?

बघण्यासाठी मी चित्रपटांची निवड शक्यतो जगातल्या विविध चित्रपट पुरस्कारांमध्ये official सिलेक्ट झालेले तसेच अवॉर्ड मिळालेले आणि माऊथ पब्लिसिटी झालेले चित्रपट अशी करतो. त्यानंतर वर दिलेल्या पर्यायांपैकी ट्रेलर वर आधारित करतो. कारण ट्रेलरमध्ये चित्रपटाची music, गीत, छायाचित्रण आणि कथेचा सुद्धा अंदाज येतो.

सिनेमात समाज, राजकारण, धर्म, जातीव्यवस्था इत्यादी मुद्दे बघू इच्छिता का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

सिनेमामध्ये समाज, राजकारण, धर्म, जातीव्यवस्था या गोष्टी पाहू शकतो. कारण या गोष्टी म्हणजे कोणतं मिथक नाही. या गोष्टी समाजाचा आरसा आहेत. ते पाहण्यात काही वाईट नाही असं मला वाटतं.

शिव्या आपल्या समाजाचे वास्तव आहे. सिनेमात शिव्या असाव्यात का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

शिव्या या समाजाचं वास्तव आहेच. आणि त्या असाव्यात या मताचा मी आहे. भारतीय सेन्सॉर बोर्डाने वयोगटानुसार प्रेक्षकांची विभागणी केली आहे. परंतु शिव्या असल्यावर त्या बऱ्याच वेळा कापल्या जातात. भारताबाहेरच्या सिनेमामध्ये शिव्यांचा वापर दृश्यानुसार आणि कथेनुसार होतो.

सिनेमाचा शेवट कसा असावा? सुखांत, दुखांत, सामाजिक संदेश, कथेनुसार, काहीही चालेल. स्पष्ट करा.

मुळात गोष्टीला शेवट कसाही असतो तसच सिनेमाचं सुद्धा आहे. म्हणून मला सिनेमाचा शेवट काहीही चालेल. परंतु आपल्याकडे सुखद शेवट असलेले चित्रपट खूप आहेत.आणि तीच मानसिकता प्रेक्षकांची सुद्धा आहे. बरलोचुतिन या दिगदर्शकाने म्हंटल आहे की "संदेश देणं हे माझ्या सिनेमाचं काम नाही ते काम पोस्ट ऑफिसचं आहे". पात्रानुसार आणि गोष्टीनुसार शेवट कसाही असू शकतो.

सिनेमाला हे सामाजिक परिवर्तन / बदलाचं माध्यम आहे का ? असेल तर का ? नसेल तर , सिनेमा फक्त मनोरंजनापूरताच मर्यादित रहावा का ?

सिनेमा हे सामाजिक परिवर्तनाचं मध्यम आहे. बऱ्याच सिनेमामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मानसिक सुधारणा होत आहेत. उदा. अस्थु आणि कासव हे सिनेमे मानसिक तणावात असणाऱ्या लोकांबद्दल बोलतो आणि बऱ्याच लोकांचे मानसिक धैर्य वाढवण्यासाठी मदत करतात. आशा विविध पद्धतीने सिनेमा सामाजिक परिवर्तनामध्ये आपली भूमिका बजावतात.

सईद मिर्झा यांचा कोणता सिनेमा आवडला? का ते स्पष्ट करा.

सईद मिर्झा यांचा अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है हा सिनेमा मला आवडला. कार मेकॅनिकल असलेला अलबर्ट पिंटो म्हणजे नसुरुद्दीन शहा मुख्य भूमिकेत आहेत. शबाना आजमी, स्मिता पाटील या सुद्धा या सिनेमामध्ये आहेत. Acting च्या दृष्टीने 100% दिलेले कलाकार यामध्ये आहेत म्हणून सुद्धा हा सिनेमा आवडतो. मुंबई मधील कामगार आणि त्यांची परिस्थिती दाखवणारा हा चित्रपट आहे यामध्ये अलबर्ट ला इतर लोकांनी आंदोलन केलेलं आवडत नसलं तरी तो सरकारी धोरणांमुळे आणि भांडवलदारांमुळे अस्वस्थ होतो. यामध्ये वापरलेली गाणी आणि संगीत विषय काळानुसार आपल्या पर्यंत पोचवतात.

आयसीए फिल्म फेस्टिव्हल बद्दल तुम्हाला काय वाटते? स्पष्ट करा.

ICA फिल्म फेस्टिवल छान झाला, ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध झाला ते विशेष महत्वाचं. वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे आणि माहितीपट पाहायला मिळाले. चर्चा सत्रातून वेगवेगळे विषय अनुभवायला मिळाले आणि विषयांची खोली समजली.

या वर्षी आयसीए फिल्म फेस्टिव्हलच्या स्पेशल स्क्रिनिंग मधील तुम्हाला कोणती फिल्म सगळ्यात जास्त आवडली? का ते स्पष्ट करा.

अजात नावाची डॉक्यूमेंटरी आवडली. यामध्ये संत परंपरेतुन जातीय निर्मूलनासाठी संतांनी संत चळवळीच्या माध्यमातून आणि त्यांच्या ओव्यांतून सामाजिक बदल घडवण्यासाठी केलेल्या साहित्याची निर्मिती आणि जातीय निर्मूलनासाठी समाजाने काय केले पाहिजे आहे याचे वर्णन आवडले आहे.

2nd Winner Name - Sujit Patil

तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता? तो का आवडला वर्णन करा.

सी. प्रेम कुमार दिग्दर्शित '96 हा तमिळ सिनेमा. हा सिनेमा अशा पद्धतीने लिहिला आणि दिग्दर्शित केलेला आहे की प्रेक्षक त्यांच्याही नकळत चित्रपटाचा भाग होऊन जातात. विजय सेतूपती आणि त्रिशा क्रिष्णन यांच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षक कथेशी समरस होऊन जातात. एक तरल कथा मनांत भावनिक आंदोलने निर्माण करते. गोविंद वसंताचे म्युजीक चित्रपटाला अतिशय उंचीवर नेऊन ठेवते. सर्वांच्या आयुष्याचा भाग असलेली ही कथा आहे. जुन्या आठवणीत रमायचं तर हा चित्रपट नक्की पहावा.

तुमचा आवडता सिने-दिग्दर्शक कोणता? का आवडतो थोडक्यात वर्णन करा.

आशुतोष गोवारीकर हे माझे आवडते दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटाची एक एक फ्रेम ही बारीक बारीक गोष्टींची काळजी घेऊन बनवलेली एक परिपूर्ण फ्रेम असते. स्वदेस, लगान हे त्यांच्या कारकिर्दीतले सर्वोत्कृष्ट चित्रपट. विषय समाज मनाचा आरसा दाखवणारे तर प्रत्येक फ्रेम आपल्याला तिथे नेऊन ठेवते. त्यांना उत्तमोत्तम चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा!

कुठे सिनेमा बघणे आवडते? ओटीटी प्लाटफॉर्म की सिनेमा थिएटर. का?

ओटीटी प्नेलॅटफॉर्म मुळे काढोही आणि कुठेही चित्रपट प्यायाहवे सोपे झाले असले तरी थिएटर मध्ये चित्रपट पाहण्याचा आनंदाची बरोबरी ओटीटी प्लॅटफॉर्म्स घेऊ शकत नाहीत असे माझे वैयक्तिक मत आहे. प्रचंड मोठ्या पडद्यावर त्या मोहक अंधारात चित्रपट आपल्याला एका जादूच्या दुनियेत घेऊन जातो. त्यात घडणाऱ्या घटना आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडताहेत असे वाटते. त्यातून समोर येणारी कथा आपल्या मन पटलावर अधिक परिणाम करते.

ओटीटी प्लाटफॉर्मवर तुम्ही फिल्म सलग बघता की तुकड्या-तुकड्यात बघता? कारण स्पष्ट करा.

शक्यतो सलग बघण्याचा प्रयत्न करतो कारण तुकड्या तुकड्यात बघितल्यास कथेचं गांभीर्य कमी होतं आणि ज्या ताकदीने तो चित्रपट भिडायला हवा तेवढा तो भिडत नाही.

फिल्म बघताना नावडता भाग गाळून फिल्म बघता का? कोणता भाग नावडता असतो? का?

फिल्म बघताना सहसा काहीही स्किप न करता एका बाजूने संपूर्ण फिल्म पाहतो कारण एखादा छोटासा सीन सुद्धा कथेचा अर्थ बदलवू शकतो. सिनेमा आधी पाहिलेला असेल तर आपल्याला भाग गाळून एखादा विशिष्ट सीन पाहायचा आनंद घेता येतो. पण शक्यतो नावडता भाग असा नसतो. चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने अनावश्यक असलेला भाग असू शकतो.

कोणत्या शैलीतील चित्रपट तुम्हाला आवडतात? फैमली ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, रोमांस, हॉरर, हिस्ट्री और बायोग्राफी बेस्ड, सत्य घटनेवर आधारित. का ते वर्णन करा?

फॅमिली ड्रामा आणि थ्रिलर हे विशेष आवडतात कारण फॅमिली ड्रामा हा आपल्याला बऱ्याचदा नात्यांना नव्याने लक्ख करायला शिकवतो, तर थ्रिलर फिल्म्स या मेंदूला चालना देतात आणि शेवटी मनोरंजनाबरोबर काहीतरी गवसल्याचा अनुभव आणि आनंद अवर्णनीय असतो.

कोणत्या सिनेमाचा क्लायमॅक्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला? का ते वर्णन करा.

सुजय घोष दिग्दर्शित आणि विद्या बालन अभिनित 'कहानी' ह्या हिंदी चित्रपटाचा क्लायमॅक्स अतिशय आवडला. सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत त्यांच्या मनात एक वेगळी कथा आकार घेत असते. एक गरोदर स्त्री आपल्या हरवलेल्या नवऱ्याचा शोध घेत असताना प्रेक्षक कळत नकळत त्या शोध मोहिमेचा एक भाग होऊन जातात आणि शेवटी देवीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हतबल स्त्री ज्या ताकदीने आपल्यासमोर उभी राहते आणि क्षणात कथेचा कोण बदलतो, तो क्लायमॅक्स प्रेक्षकांना अवाक करून सोडतो.

बघण्यासाठी फिल्मची निवड तुम्ही कशाच्या आधारावर करता? कथा, अभिनेता/अभिनेत्री, दिग्दर्शक, गीत-संगीत, ट्रेलर, पटकथा लेखक, छायाचित्रकार?

दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट आणि नवीन चित्रपटाचा ट्रेलर हे चित्रपट बघावा की बघू या निर्णयात मोलाची भूमिका बजावतात. ट्रेलर आकर्षक होण्यासाठी दिग्दर्शकासोबत अभिनेता/अभिनेत्री तसेच छायाचित्रण आणि संगीत ही तितकेच मोलाचे ठरते.

सिनेमात समाज, राजकारण, धर्म, जातीव्यवस्था इत्यादी मुद्दे बघू इच्छिता का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

हो नक्कीच. सिनेमा हा समाजमनाचा आरसा मानला जातो. त्यामुळे समाज जीवनावर परिणाम करणारे घटक म्हणून राजकारण, धर्म, जातीव्यवस्था हे मुद्दे सिनेमाचा महत्वाचा भाग असायला हवेत. सिनेमा हे कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळे मनोरंजनासोबतच त्यातून योग्य त्या गोष्टी दाखवण्यात आल्या तर ती एक क्रांती होऊ शकते.

शिव्या आपल्या समाजाचे वास्तव आहे. सिनेमात शिव्या असाव्यात का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

सरसकट शिव्या असाव्या असे म्हणता येणार नाही पण जिथे शिव्यांशिवाय कथेचा आशय योग्य त्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही असे वाटत असेल तेथे शिव्या असाव्यात असे वाटते. त्यात पुन्हा कुठल्या प्रेक्षक वर्गाला हा चित्रपट आपण संबोधित करत आहोत त्यानुसार हे प्रमाण ठरवता येईल. शेवटी सेन्सर बोर्ड ही आपली भूमिका पार पाडत असतेच.

सिनेमाचा शेवट कसा असावा? सुखांत, दुखांत, सामाजिक संदेश, कथेनुसार, काहीही चालेल. स्पष्ट करा.

कथेच्या गरजेनुसार शेवट हा ठरायला हवा. दिग्दर्शकाला आपल्या कथेतून काय सांगायचे आहे आणि काय परिणाम साधायचा आहे त्यावर सुखांत की सुखांत हे ठरते. सामाजिक संदेश हा या सोबत ही देता येऊ शकतो असे वाटते. शक्य तितका चित्रपट हा सकारात्मक असावा जेणेकरून प्रेक्षकांना नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल.

सिनेमाला हे सामाजिक परिवर्तन / बदलाचं माध्यम आहे का ? असेल तर का ? नसेल तर , सिनेमा फक्त मनोरंजनापूरताच मर्यादित रहावा का ?

नक्कीच चित्रपट हे समाज बदलाचे माध्यम होऊ शकते. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला तर तो सिनेमा अभिव्यक्तीचे खरे माध्यम म्हणून पुढे येऊ शकतो.

सईद मिर्झा यांचा कोणता सिनेमा आवडला? का ते स्पष्ट करा.

'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है?' हा सिनेमा. कामगार आणि भांडवलदार यांच्यातल्या संघर्षाची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा नायकाच्या माध्यमातून तात्कालिक राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमके बोट ठेवतो हे दिग्दर्शकाचे असामान्य कौशल्य आहे. ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा विकसित करून त्या आपल्यातीलच एक वाटतील या पद्धतीने चित्रपटात येतात आणि चित्रपट संपताना आपण एक अस्वस्थता घेऊन घरी जातो यात दिग्दर्शकाचे यश आहे.

आयसीए फिल्म फेस्टिव्हल बद्दल तुम्हाला काय वाटते? स्पष्ट करा.

आयसीए फिल्म फेस्टिवल हा जगातल्या उत्कृष्ट फिल्म मेकर्स ना एकत्र आणणारा चित्रपट महोत्सव आहे. तसेच चित्रपट सृष्टीतले अतिशय ज्येष्ठ आणि गुणी व्यक्तिमत्वाना या फेस्टिवल ला आमंत्रित केले जाते आणि त्यांच्या मार्गदर्शनाची सुवर्ण संधी उपलबद्ध होते. या फेस्टिवलच्या माध्यमातून नवनवीन होतकरू चित्रपट निर्मात्यांना एक मंच मिळतो आणि त्यात जर त्यांच्या कलाकृतीला योग्य तो सन्मान मिळाला तर त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी ती एक संजीवनी ठरू शकते. त्यामुळे हा फेस्टिवल असाच उत्तरोत्तर खुलत जावा ही शुभेच्छा!💐

या वर्षी आयसीए फिल्म फेस्टिव्हलच्या स्पेशल स्क्रिनिंग मधील तुम्हाला कोणती फिल्म सगळ्यात जास्त आवडली? का ते स्पष्ट करा.

मितेश ताके दिग्दर्शित 'दुर्गाज लोकडाऊन ही फिल्म. कोविड च्या लोकडाऊन काळात घरात अडकून पडल्या नंतर स्त्रियांवर वाढलेले घरगुती हिंसाचार यावर आधारित असलेली ही अतिशय उत्कृष्ट अशी सायलेंट फिल्म आहे.

3rd Winner Name - Yogesh Gacche

तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता? तो का आवडला वर्णन करा.

युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

तुमचा आवडता सिने-दिग्दर्शक कोणता? का आवडतो थोडक्यात वर्णन करा.

जब्बार पटेल

कुठे सिनेमा बघणे आवडते? ओटीटी प्लाटफॉर्म की सिनेमा थिएटर. का?

थिएटर

ओटीटी प्लाटफॉर्मवर तुम्ही फिल्म सलग बघता की तुकड्या-तुकड्यात बघता? कारण स्पष्ट करा.

तसा काही विषय नाही. दोन्ही पद्धतीत बघणे आवडते

फिल्म बघताना नावडता भाग गाळून फिल्म बघता का? कोणता भाग नावडता असतो? का?

फायटिंग सिन

कोणत्या शैलीतील चित्रपट तुम्हाला आवडतात? फैमली ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, रोमांस, हॉरर, हिस्ट्री और बायोग्राफी बेस्ड, सत्य घटनेवर आधारित. का ते वर्णन करा?

सत्यघटनेवर कारण की आपल्याला इतिहासाची माहिती मिळते म्हणून

कोणत्या सिनेमाचा क्लायमॅक्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला? का ते वर्णन करा.

सत्यघटनेवर कारण की आपल्याला इतिहासाची माहिती मिळते म्हणून

बघण्यासाठी फिल्मची निवड तुम्ही कशाच्या आधारावर करता? कथा, अभिनेता/अभिनेत्री, दिग्दर्शक, गीत-संगीत, ट्रेलर, पटकथा लेखक, छायाचित्रकार?

कथा व गीत संगीत

सिनेमात समाज, राजकारण, धर्म, जातीव्यवस्था इत्यादी मुद्दे बघू इच्छिता का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

मी तस सत्य घडणावरील चित्रपट पाहणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यात सर्व गोष्टी मी पाहत असतो.

शिव्या आपल्या समाजाचे वास्तव आहे. सिनेमात शिव्या असाव्यात का? होय असेल तर का आणि नाही असेल तर का नाही स्पष्ट करा.

खरं तर शिव्या जरी समाजाचे वास्तव असेल तरी मला वाटते शिव्या चित्रपटातून वगळून टाकाव्यात कारण की त्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर होतो.

सिनेमाचा शेवट कसा असावा? सुखांत, दुखांत, सामाजिक संदेश, कथेनुसार, काहीही चालेल. स्पष्ट करा.

सामाजिक संदेशलोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असावा

सिनेमाला हे सामाजिक परिवर्तन / बदलाचं माध्यम आहे का ? असेल तर का ? नसेल तर , सिनेमा फक्त मनोरंजनापूरताच मर्यादित रहावा का ?

खर तर सर्व कला या सामाजिक परिवर्तनासाठी निर्माण झालेल्या असाव्यात आणि अज्ञान दूर करण्याचा या कलेचा उदेश आहे असं मला वाटते.

सईद मिर्झा यांचा कोणता सिनेमा आवडला? का ते स्पष्ट करा.

माफ करा मी अजून तरी यांचा कुठला चित्रपट अजून तरी पहिला नाही.

आयसीए फिल्म फेस्टिव्हल बद्दल तुम्हाला काय वाटते? स्पष्ट करा.

उपक्रम छान करत आहेत त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा

या वर्षी आयसीए फिल्म फेस्टिव्हलच्या स्पेशल स्क्रिनिंग मधील तुम्हाला कोणती फिल्म सगळ्यात जास्त आवडली? का ते स्पष्ट करा.

अजून तरी मी पाहिली नाही